भविष्याचा विचार करणारा माणूस
तुम्ही कधी विचार केला आहे का की, ChatGPT, Siri, Alexa, किंवा Google Assistant यांसारखी यंत्रणा कशी काम करतात? त्यांच्यामागे असलेली विज्ञानशक्ती म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्ता – Artificial Intelligence (AI). आणि या AI संकल्पनेचा पाया घालणारे, तिचं नाव देणारे, आणि तिच्या मूलभूत कल्पना मांडणारे वैज्ञानिक म्हणजेच John McCarthy.
सुरुवात – लहानपणापासूनच बुद्धिमान
John McCarthy यांचा जन्म ४ सप्टेंबर १९२७ रोजी अमेरिकेतील बोस्टन शहरात झाला. ते लहानपणापासूनच अत्यंत बुद्धिमान होते. गणितात त्यांना विशेष रस होता. त्यांनी कॉलेजमध्ये असतानाच अत्यंत जटिल गणिती संकल्पना आत्मसात केल्या. त्यांनी Caltech (California Institute of Technology) मधून गणित विषयात पदवी घेतली आणि Princeton University येथून Ph.D. पूर्ण केली.
Artificial Intelligence या शब्दाचा जन्म
१९५६ साली त्यांनी Dartmouth Conference मध्ये जगाला एक नवा शब्द दिला तो म्हणजे–Artificial Intelligence.
या परिषदेचा उद्देश होता संगणकांना मानवीप्रमाणे "विचार" करायला शिकवण्याच्या शक्यतेवर चर्चा करणे. John McCarthy यांनी तिथे AI या क्षेत्राची व्याख्या केली:
"Every aspect of learning or any other feature of intelligence can in principle be so precisely described that a machine can be made to simulate it.
म्हणजेच, माणसाच्या बुद्धीचे सर्व पैलू संगणकाद्वारे अनुकरण करता येतील, असे त्यांनी ठामपणे मांडले.
LISP – AI साठी विशेष भाषा
John McCarthy यांचे आणखी एक क्रांतिकारी कार्य म्हणजे १९५८ मध्ये तयार केलेली LISP ही प्रोग्रॅमिंग भाषा.
LISP ही भाषा विशेषतः कृत्रिम बुद्धिमत्तेसाठी डिझाइन करण्यात आली होती आणि आजही अनेक AI प्रणालींमध्ये तिचा वापर केला जातो.
LISP नंतरही आज Python, Prolog यांसारख्या भाषांमध्ये AI विकसित होत असले, तरी LISP हे त्याचे मूळ मानले जाते.
AI विषयातील मूलभूत संकल्पना
John McCarthy यांनी AI साठी खालील मूलभूत गोष्टी विकसित केल्या:
1. Knowledge Representation – संगणकाला माहिती कशी "समजावून" सांगायची.
2. Time-sharing Systems – संगणक एकाच वेळी अनेक वापरकर्त्यांसाठी वापरता यावा.
3. Machine Reasoning– यंत्रे लॉजिक वापरून निर्णय कशी घेऊ शकतील.
4. Common Sense Reasoning– मशीनला सामान्य माणसासारखा विचार देण्याचा प्रयत्न.
पुरस्कार आणि सन्मान
John McCarthy यांच्या भरीव कार्याची दखल संपूर्ण जगाने घेतली. त्यांना अनेक प्रतिष्ठित पुरस्कार मिळाले:
त्यांना मिळालेले पुरस्कार आणि वर्ष
Turing Award (संगणकशास्त्रातील सर्वोच्च सन्मान) -1971
National Medal of Science(अमेरिकेचा सर्वोच्च विज्ञान पुरस्कार)-1990
Kyoto Prize(जपानचा नामांकित पुरस्कार)-1988
Benjamin Franklin Medal-2003
McCarthy आणि आज
John McCarthy यांच्या कल्पना आजच्या यंत्रमानव, स्मार्टफोन असिस्टंट्स, चैटबॉट्स, आणि ऑटोमेशन प्रणालींमध्ये जिवंत आहेत. त्यांनी कल्पना केली होती की एक दिवस संगणक माणसांसारखा विचार करू शकेल – आणि आज, AI च्या युगात, त्यांची ती कल्पना हळूहळू प्रत्यक्षात उतरते आहे.
Comments
Post a Comment