आज तुम्ही पदविका इंजिनीरिंग किंवा पदवी इंजिनीरिंग
च्या प्रवेशासाठी सुविधा केंद्रात गेलात तर तुम्हाला एक गोष्ट प्रामुख्याने दिसेल की
नोंदणीसाठी आलेल्या ९० टक्के विद्यार्थ्यांना आर्टिफिशियल इंटेलिजन्स, डेटा सायन्स,
मशीन लर्निंग, कॉम्पुटर किंवा आय टी मध्ये प्रवेश हवा आहे. या मागचं कारण स्पष्ट आहे
—आजचं युग डिजिटल तंत्रज्ञानाचं युग आहे. मोबाईल अॅप्स, वेब डेव्हलपमेंट, डेटा सायन्स,
आर्टिफिशियल इंटेलिजन्स बेस्ड सोल्युशन्स, गेम डेव्हलपमेंट, सायबर सिक्युरिटी यांसारख्या
संकल्पनांनी तरुणाईला भुरळ घातली आहे.
पालकही आपली मुलं 'कोडिंग' शिकावी, 'सॉफ्टवेअर इंजिनिअर' व्हावी, अशी स्वप्नं पाहत आहेत — आणि त्यामध्ये काही वावगंही नाही.
पण खरा प्रश्न असा आहे की, "फक्त शाखा निवडून यश मिळेल का?" काही पालक आणि विद्यार्थी तर असेही दिसतात की माझ्या मित्राने, दादाने, ताईने, शेजाऱ्या पाजाऱ्याने कॉम्पुटर शाखा घेतली होती म्हणून हा ही तीच शाखा घेणार, अरे पण यात मुलाची आवड, भविष्यात त्या शाखेचे अस्तित्व, विद्यार्थ्याला मिळालेले गुण याचा कोठेही संबंध नसतो.
मित्रांनो, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, आय टी, कॉम्पुटर या शाखा यशाचं गारंटी कार्ड नाहीत, तुमची शाखा कोणतीही असो — मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स, सिव्हिल, केमिकल की कॉम्पुटर — यशस्वी होण्यासाठी आज केवळ पुस्तकातील ज्ञान किंवा शाखेची पारंपरिक माहिती पुरेशी नाही. तंत्रज्ञान प्रगतीच्या या झपाट्याने वाढणाऱ्या युगात, स्वतःहून शिकण्याची तयारी, सातत्यपूर्ण सराव, आणि नवीन तंत्रज्ञान स्वीकारण्याची जिद्द हेच खरे यशाचे साधन ठरते.
आजच्या डिजिटल युगात एक नाव सतत ऐकायला येते – प्रॉम्प्ट इंजिनिअरिंग. अगदी सोप्या भाषेत सांगायचं झालं, तर प्रॉम्प्ट इंजिनिअरिंग म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स टूल्सना योग्य प्रकारे सूचना देऊन आपल्या गरजेनुसार उत्तरे, कोड, रिपोर्ट्स, डिझाइन्स, किंवा कल्पना तयार करून घेण्याची कला. हे तुम्ही ChatGPT, Gemini, Claude, Copilot सारख्या टूल्सच्या मदतीने सहज करू शकता.
आजच्या वेगवान आणि सतत बदलणाऱ्या तांत्रिक युगात एखाद्या विद्यार्थ्याने कोणती शाखा निवडली याला तितकं महत्त्व उरलेलं नाही, जितकं त्याने घेतलेलं ज्ञान, केलेला सराव आणि शिकण्याविषयीची भूमिका याला आहे. "शाखा नाही, सराव महत्त्वाचा!" हे विधान फक्त एक घोषवाक्य नाही, तर यशाकडे जाणाऱ्या मार्गाचा दिशादर्शक आहे.
पूर्वीच्या काळात विशिष्ट शाखा हीच यशाची हमी मानली जायची. उदाहरणार्थ, कॉम्पुटर किंवा इलेक्ट्रॉनिक्स या शाखांमध्ये प्रवेश घेतला की, चांगली नोकरी मिळेल असं गृहित धरलं जायचं. पण आता परिस्थिती पूर्णपणे बदलली आहे. आज मेकॅनिकल, सिव्हिल, केमिकल अगदी कोणतीही शाखा असो – जर त्या विद्यार्थ्याने आधुनिक कौशल्यं शिकण्याचा निर्धार केला आणि त्यावर सातत्याने सराव केला, तर तो कोणत्याही क्षेत्रात यशस्वी होऊ शकतो.
उदाहरण द्यायचं झालं, तर एखादा मेकॅनिकल शाखेतील विद्यार्थी जर 3D मॉडेलिंग टूल्स जसे की SolidWorks, CATIA यांचा सराव करत असेल आणि त्याचवेळी प्रॉम्प्ट इंजिनिअरिंगचा वापर करून AI च्या सहाय्याने डिझाईन आयडियाज शोधत असेल, तर तो सहजपणे एका कॉम्पुटर शाखेतील विद्यार्थ्याशी स्पर्धा करू शकतो. त्याचप्रमाणे, एक सिव्हिल शाखेतील विद्यार्थी जर ChatGPT चा वापर करून AutoCAD चे कोड, IS कोड्सचे सारांश, बांधकाम प्रक्रियांचे सविस्तर स्पष्टीकरण शोधत असेल आणि त्याचा सराव करत असेल, तर तो पारंपरिक शिक्षणाच्या पुढे जातो.
सराव हे यशाचं मूळ बीज आहे. प्रत्येक वेळी काही नवीन शिकण्याचा प्रयत्न केल्यावर आपल्याला सुरुवातीला अडचणी येतात. पण जर आपण त्या अडचणींना सामोरं जात सराव करत राहिलो, तर त्याच अडचणी एक दिवस आपली ताकद बनतात. उदाहरणार्थ, जर एखादा इलेक्ट्रिकल विद्यार्थी दररोज 15 मिनिटं वेळ काढून ChatGPT किंवा इतर आर्टिफिशियल इंटेलिजन्स टूल्सवर इलेक्ट्रिकल सर्किट्स, प्रोजेक्ट आयडियाज, कोडिंग किंवा सॉफ्ट स्किल्सचा सराव करत असेल, तर तो इतरांपेक्षा एक पाऊल पुढेच राहतो.
"शाखा नाही, सराव महत्त्वाचा!" या विधानामागचं खऱ्या अर्थाने सत्य म्हणजे – तुमचं भविष्य तुमच्या हातात आहे. फक्त शाखेवर विसंबून न राहता, सतत सराव, नवीन कौशल्य शिकण्याची तयारी, आणि आधुनिक तंत्रज्ञानाची ओळख यावर लक्ष केंद्रित केलं तर तुम्ही कोणत्याही क्षेत्रात यशस्वी होऊ शकता.
यश फक्त बुद्धिमत्तेवर किंवा शाखेवर अवलंबून नसतं, तर "मी आज नवीन काय शिकलो?" या प्रश्नाचं उत्तर शोधण्यातून मिळतं. म्हणूनच, तुमचं क्षेत्र कोणतंही असो – जर तुम्ही नियमित सराव करत असाल, स्वतःमध्ये सुधारणा करत असाल आणि नवीन गोष्टी स्वीकारायला तयार असाल, तर तुम्ही निश्चितच यशस्वी व्हाल. हेच खरं "शाखा नाही, सराव महत्त्वाचा!".

Comments
Post a Comment