Skip to main content

छत्रपती शिवाजी महाराज द मॅनेजमेंट गुरू,(chatrapati shivaji maharaj the management guru)

Management is art of getting work done from people
दुसऱ्याकडून काम करून घेणे ही एक कला आहे असे म्हणतात, पण संभाजी कावजी, येसाजी कंक, बाजी पासलकर,तानाजी मालुसरे, बाजीप्रभू देशपांडे, जीवा महाल, मदारी मेहतर, नेताजी पालकर,बहिर्जी नाईक, मुरारबाजी देशपांडे असे जीवाला जीव देणारे सहकारी निर्माण करणे फक्त आणि फक्त छत्रपती शिवाजी महाराजांनाच जमू शकते.

संत रामदास स्वामी म्हणतात "या भूमंडळाचे ठायी धर्म रक्षी ऐसा नाही"
महाराजांसारखे धर्माचे रक्षण करणारी व्यक्ती या पृथ्वीतलावर दुसरी नाही.

१६४५ ला शिवाजी महाराजांनी रायरेश्वराच्या मंदिरात काही निवडक साथीदारां सोबत स्वराज्य स्थापनेची प्रतिज्ञा घेतली, त्यावेळेस महाराज केवळ १६ वर्षाचे होते.

१६४६ ला तोरणा आणि त्यानंतर लवकरच महाराजांनी कोंढाणा, पुरंदर, राजगड सारखे महत्वपूर्ण किल्ले काबीज केले, महाराजांचे असे म्हणणे होतं की, किल्ला जिंकला की आजू बाजूच्या प्रदेशावर लक्ष ठेवायला मदत होते.
जावळीच्या मुलखावर ताबा मिळवायचा असेल तर रायगड स्वराज्यात शामिल व्हायलाच हवा, त्यावेळेस तो किल्ला आदिलशाही कडे होता, महाराजांनी चंद्रराव मोरे, अदिलशाहीचा एक निष्ठावंत सरदार, आणि त्याला हरवून राजांनी किल्ला आपल्या ताब्यात घेतला.

रायगड आपल्या हातून गेला म्हटल्यावर आदिलशाही चे त्यावेळेस च काम बघणारी बडीबेगम रागाने लाल झाली आणि शिवाजीचा बंदोबस्त करण्यासाठी १६५९ ला अफझल खानाला मोठ्या लवाजम्यात महाराष्ट्रात पाठवले, कर्नाटकातून तो कृष्णेच्या खोऱ्यातून वाई ला पोहोचला,येतांना तो सर्व प्रदेश लुटत,देवळाचे नुकसान करत येत होता, महाराजांनी खानाला प्रतापगडा खाली बोलावले आणि त्याला ठार केले, आता तुम्ही म्हणाल यात functions of management कुठे दिसत आहे?
खान चाल करत आहे म्हटल्यावर राजांनी Planning सुरू केली, त्यात घाबरलो आहे असे दाखवून खानाला प्रतापगडा खाली बोलवायचं, कोयनेच्या खोऱ्या मुळे खान पूर्ण सैन्य घेऊन येऊ शकणार नाही आणि सैन्याचे दोन भाग होतील हे जाणले होते, त्यानंतर मधल्या काळात राजांनी आपल्या सहकाऱ्यांना एकत्रित बोलावलं आणि त्यांना जवाबदाऱ्या दिल्या याला आपण organising असे म्हणतो.

जसेकी ५००० सैन्य घेऊन नेताजी पालकर यांना दुसऱ्या रस्त्याने महाबळेश्वर ला पाठवले, काही तुकड्या सासवड,शिरवळ,सुपे ला पाठवल्या,
आणि काही तुकडयानी खानाच्या सैन्याला घेरले याला आपण directing अस म्हणतो, राजांनी आपल्या सैन्या सोबतच खानाच्या सैन्याला ही control केले, आणि खानाला ठार केले...याला आपण functions of management असे म्हणतो.

महाराजांच्या काळात शेती हे जरी उत्पन्नाचे प्रमुख साधन असले तरी महाराजांनी कापड उद्योग, धातूची भांडी, कागद, जडजवाहीर, मीठ, नीळ, लाकुडकाम, जहाज बांधणी यासारख्या उद्योगांना प्रोत्साहन दिले आणि रायगड, राजगड येथे मोठ्या बाजारपेठा आणि सोलापूर,वसई, ठाणे,सातारा,पुणे,कोल्हापूर येथे व्यापारपेठा वसवल्या.

आज आपण शिकत असलेले Types of business
1) Trade 2) Service 3) Manufacturing
हे महाराजांनी तेव्हाच जाणले होते.

युरोपियन लोक व्यापार, विज्ञान, तंत्रज्ञान, दारूगोळा वैगरे क्षेत्रात प्रगत आहेत हे महाराजांना ज्ञात होते म्हणुन फ्रेंच, पोर्तुगीजाणं कडून तोफा व दारूगोळा मिळवला,त्याच प्रमाणे कर्नाटक मोहिमेवर असतांना मद्रासच्या इंग्रजां कडे अभियंते आणि तंत्रज्ञ मागितले , यालाच आपण Globalization असे म्हणतो.

महाराजांच्या आरमारात इब्राहिम खान, दौलतखान, मायनायक भंडारी, सिद्धी संबुळ, सिद्धी मिस्त्री या शिवाय ख्रिश्चन,कोळी वैगेरे अनेक धर्माचे लोक होते, राज्यांनी सर्व जाती धर्माचे प्रतिनिधित्व केले होते, वंश परंपरेने न नेमता गुणवत्ते प्रमाणे कर्तृत्ववान व्यक्तीला महत्वाच्या पदावर नेमले,त्यांना राष्ट्र कार्यासाठी प्रोत्साहन दिले,लढण्याची जिद्द निर्माण केली त्यातूनच संताजी घोरपडे,धनाजी जाधव या सारखे उत्कृष्ठ सेनानी पुढे आले यालाच आपण levels of management असे म्हणतो.

महाराजांनी राजकारण, लष्कर, आरमार, राज्यकारभार, मुत्सद्देगिरी आशा विविध क्षेत्रात लोकांची नियुक्ती केली,त्याला आपण departmentation असे म्हणतो.

आज आपण Income Tax, Sales tax, VAT, Property tax आणि आता GST भरत असतो, पण शिवकाळात सुद्धा जमिनीच्या प्रकारानुसार, पिकानुसार,जिरायती की बागायती या निकषांवरून उत्पन्नाच्या २/५ एवढा शेतसारा आकारला जायचा.
१६६० ते १६६३ पर्यंत शाईस्तेखानाने पुण्यात राहून आजूबाजूच्या गावांची लूट केली त्याचा मोबदला म्हणजे त्याला आपले ३ बोट गमवावी लागली आणि मुघलांना धडा शिकवण्यासाठी मुघलांच्या श्रीमंत बाजार पेठेवर म्हणजे सुरतेची लूट केली याला आपन sources to raise the finance असे म्हणत असतो.

२५ नोव्हेंबर १६६४ ला इंग्लिश, डच, फ्रेंच आणि पोर्तुगीज लोकांवर वचक बसवण्यासाठी अरबी समुद्रात ४८ एकर मध्ये एक किल्ला बांधला , त्या किल्याला ४००० pound लीड आणि असंख्य दगड लागले १६६३ ते १६६७ या ३ वर्षात लागणारे raw मटेरियल, कामगार महाराजांनी कसे पुरवले असतील . त्याकाळी ABC analysis, MRP, TQM, ERP, SAP, 6 sigma, ISO standards, quality assurance आणि quality circle अश्या गोष्टींचा उदय सुद्धा झाला नव्हता तरीही आज सिंधुदुर्ग किल्ला भरभक्कम उभा आहे.

अश्या या युग पुरुषाचे निधन ३ एप्रिल १६८० ला रायगडावर झाले,  आज ३५० वर्षानंतर सुद्धा शिवाजी महाराजांचे नाव आपल्या सर्वांच्या हृदयात कोरलेले आहे त्यामुळे आपण केलेल्या कार्याबद्दल त्यांना नकीच समाधान वाटत असेल पण स्त्रियांवर होणारे अत्याचार,आतंकवाद, जातीयवाद,गरीब श्रीमंत यामध्ये वाढणारी दरी नक्कीच महाराजांना दुःखी करत असणार यात शंकाच नाही.

शेवटी मी एवढेच बोलेल आपल्या कडे Management चा समुद्र असतांना आपण FW Taylor, Henry Fayol सारख्या पाश्चात्य लोकांचे विचार का अवलंबतो आहोत असा प्रश्न उद्भवतो...

जय भवानी जय शिवाजी

Comments

Popular posts from this blog

इंजिनीरिंगच्या शाखा नाही, तर सातत्यपूर्ण सराव, नवीन कौशल्य शिकण्याची तयारी महत्वाची

आज तुम्ही पदविका इंजिनीरिंग किंवा पदवी इंजिनीरिंग च्या प्रवेशासाठी सुविधा केंद्रात गेलात तर तुम्हाला एक गोष्ट प्रामुख्याने दिसेल की नोंदणीसाठी आलेल्या ९० टक्के विद्यार्थ्यांना आर्टिफिशियल इंटेलिजन्स, डेटा सायन्स, मशीन लर्निंग, कॉम्पुटर किंवा आय टी मध्ये प्रवेश हवा आहे. या मागचं कारण स्पष्ट आहे —आजचं युग डिजिटल तंत्रज्ञानाचं युग आहे. मोबाईल अ‍ॅप्स, वेब डेव्हलपमेंट, डेटा सायन्स, आर्टिफिशियल इंटेलिजन्स बेस्ड सोल्युशन्स, गेम डेव्हलपमेंट, सायबर सिक्युरिटी यांसारख्या संकल्पनांनी तरुणाईला भुरळ घातली आहे. पालकही आपली मुलं 'कोडिंग' शिकावी, 'सॉफ्टवेअर इंजिनिअर' व्हावी, अशी स्वप्नं पाहत आहेत — आणि त्यामध्ये काही वावगंही नाही. पण खरा प्रश्न असा आहे की, "फक्त शाखा निवडून यश मिळेल का?" काही पालक आणि विद्यार्थी तर असेही दिसतात की माझ्या मित्राने, दादाने, ताईने, शेजाऱ्या पाजाऱ्याने कॉम्पुटर शाखा घेतली होती म्हणून हा ही तीच शाखा घेणार, अरे पण यात मुलाची आवड, भविष्यात त्या शाखेचे अस्तित्व, विद्यार्थ्याला मिळालेले गुण याचा कोठेही संबंध नसतो. मित्रांनो , आर्टिफिशियल इंटेलिजन्स ,...

कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) म्हणजे काय?

आज आपण तंत्रज्ञानाच्या अशा वळणावर आहोत जिथे संगणक, मोबाइल आणि रोबोट्स आपल्या रोजच्या जीवनाचा एक भाग होत चालले आहेत. या सगळ्याच्या केंद्रस्थानी असणारे तंत्रज्ञान म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्ता (Artificial Intelligence – AI). कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजे काय? कृत्रिम बुद्धिमत्ता, किंवा AI, ही एक अशी संगणकीय प्रणाली आहे जी मानवाच्या मेंदूप्रमाणे विचार करू शकते, शिकू शकते, निर्णय घेऊ शकते आणि समस्या सोडवू शकते. उदाहरणार्थ, जेव्हा आपण Google Maps वापरतो, व्हॉईस असिस्टंटला प्रश्न विचारतो, YouTube आपल्याला आवडणारे व्हिडिओ सुचवतो – ते सर्व AI च्या साहाय्यानेच घडते. AI चा शोध कोणी लावला? कृत्रिम बुद्धिमत्तेचा शोध ही एक व्यक्तीने लावलेली गोष्ट नाही. यामागे अनेक शास्त्रज्ञ आणि संगणक तज्ज्ञांचे वर्षानुवर्षांचे योगदान आहे. खाली काही महत्त्वाचे संशोधक व त्यांच्या भूमिका दिल्या आहेत: 1. Alan Turing (अ‍ॅलन ट्युरिंग) – 1950 AI संकल्पनेचा पाया घालणारे पहिले शास्त्रज्ञ. त्यांनी “मशीन विचार करू शकते का?” असा एक मूलभूत प्रश्न उपस्थित केला आणि Turing Test नावाचा प्रयोग सुचवला, जो आजही मशीनची "बुद्धिमत्ता...