नवीन काहीही करायचे म्हटले की विरोध हा होणारच, पण त्या गोष्टींचा सर्वांगीण विचार करून आपली मत मांडण्या पलीकडे विरोधाला विरोध करणारी, आपली मुलं इंग्लिश शाळे मधे घालून मराठी कशी लोप पावत आहे यावर चर्चा करणाऱ्याना माझा प्रणाम.
मागच्या वर्षीच चालू झालेल्या संख्या वाचन पद्धतीला यावर्षी विरोध का होत आहे हा विषय तर समजण्या पलीकडेच आहे.
मराठी संख्या वाचन आणि इंग्लिश पद्धतीने संख्या वाचन यात महत्वाचा फरक म्हणजे मराठी मध्ये जे संख्या वाचक नाम आहेत ते इंग्लिश मध्ये नाहीत, उदा. सत्तेचाळीस म्हणजेच इंग्लिश मधले Fourth Seven.
जसे आपण सोपं जावं म्हणून १८५७ ला अठराशे सत्तावन म्हणतो तसेच एक हजार सत्तावन सुद्धा म्हणतो आणि एक हजार सत्तावन म्हणायला आणि समजायला काही प्रमाणात सोपे जाते.
घड्याळात १.३० म्हणजे दीड आणि एक वाजून तीस मिनिटे सुद्धा यात एक वाजून तीस मिनिटे असं म्हणायला सोपं जात.
आपले अंकगणित हे दशमान पद्धतीवर, पाठांतरावर अवलंबुन आहे त्यात आपण २२ ला वीस दोन म्हटलं तर काय बिघडतय, सौ. मंगला नारळीकर म्हणतच आहेत की पुस्तकात जुनी आणि नवी दोनीही पद्धती आहेत म्हणजे त्यांनी एकीकडे सोपी पद्धत आणून आणि दुसरी कडे संख्यावाचक नाम तश्याला तसे ठेवून संख्यावाचन विद्यार्थ्याला सोपं करून दिले आहे आणि वरील वर्गात आहेच की जुनी पद्धत त्यामुळे मराठीचा ऱ्हासवगैरे होईल हे चुकीचे आहे जोडाक्षरे अंकातलेच का गरजेचे आहे मराठी वाचनात येतातच की जोडाक्षरे.
आज तुम्ही पदविका इंजिनीरिंग किंवा पदवी इंजिनीरिंग च्या प्रवेशासाठी सुविधा केंद्रात गेलात तर तुम्हाला एक गोष्ट प्रामुख्याने दिसेल की नोंदणीसाठी आलेल्या ९० टक्के विद्यार्थ्यांना आर्टिफिशियल इंटेलिजन्स, डेटा सायन्स, मशीन लर्निंग, कॉम्पुटर किंवा आय टी मध्ये प्रवेश हवा आहे. या मागचं कारण स्पष्ट आहे —आजचं युग डिजिटल तंत्रज्ञानाचं युग आहे. मोबाईल अॅप्स, वेब डेव्हलपमेंट, डेटा सायन्स, आर्टिफिशियल इंटेलिजन्स बेस्ड सोल्युशन्स, गेम डेव्हलपमेंट, सायबर सिक्युरिटी यांसारख्या संकल्पनांनी तरुणाईला भुरळ घातली आहे. पालकही आपली मुलं 'कोडिंग' शिकावी, 'सॉफ्टवेअर इंजिनिअर' व्हावी, अशी स्वप्नं पाहत आहेत — आणि त्यामध्ये काही वावगंही नाही. पण खरा प्रश्न असा आहे की, "फक्त शाखा निवडून यश मिळेल का?" काही पालक आणि विद्यार्थी तर असेही दिसतात की माझ्या मित्राने, दादाने, ताईने, शेजाऱ्या पाजाऱ्याने कॉम्पुटर शाखा घेतली होती म्हणून हा ही तीच शाखा घेणार, अरे पण यात मुलाची आवड, भविष्यात त्या शाखेचे अस्तित्व, विद्यार्थ्याला मिळालेले गुण याचा कोठेही संबंध नसतो. मित्रांनो , आर्टिफिशियल इंटेलिजन्स ,...
Comments
Post a Comment